Tribal Development Department
Add more content here...

Central Schemes

Central Schemes

केंद्रीय योजना माहीती नोट

जनजाती कार्य मंत्रालय, केंद्र शासन यांच्याकडून आदिवासी विकास विभागास खालील योजनांसाठी केंद्रीय सहाय्य प्रतिवर्ष उपलब्ध करुन देण्यात येते.

  • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) योजना अंतर्गत सहाय्यक अनुदान.
  • प्रधान मंत्री आदी आदर्श ग्राम योजना –
  • आदिम जमाती (PVTGs)संरक्षण तथा विकास कार्यक्रम


१) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) योजना अंतर्गत सहाय्यक अनुदान.

  • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत राज्य शासनास केंद्र सहाय्य उपलब्ध होते.
  • अलीकडेच दि. 23 एप्रिल 2020 रोजी केंद्र शासनाद्वारे नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
  • सदर योजनेंतर्गत प्राप्त निधीतुन विविध व्यक्तीगत तसेच समुह विकास कार्यक्रम राबविण्यात येत असतात.
  • सन 2018-19 ते 2021-22 या कालावधीकरिता प्राप्त निधीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे.
Year Scheme

Project Sanctioned

fund Sanctioned fund Received
275(1) 2018-19 32 17015.91 17015.91
2019-20 26 23136.7 23136.7
2020-21 11 10427.71 4573.16
2021-22 - - -
2022-23 - - -

Total

69 50580.32 44725.77

२) प्रधान मंत्री आदी आदर्श ग्राम योजना

  • सन 2021-22 पासुन विशेष केंद्रीय सहाय्य ह्या योजनेएवजी प्रधान मंत्री आदी आदर्श ग्राम योजना राबविण्यत येत आहे. याकरिता केंद्र शासनाने दि. 22.03.2022 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुषंगाने दिनांक 13.07.2022 रोजी राज्यशासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
  • सदर योजना सन 2021-22 ते 2025-26 या कालवधीकरिता केंद्र शासनाने निवडलेल्या 3605 गावांमध्ये राबविणेत येणार आहे. सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये 1542 गावांच्या रु. 31425.96 लक्ष किंमतीच्या ग्राम विकास आराखड्यांना केंद्र शासनाकडुन मान्यता मिळाली आहे.

आदिम जमाती (PVTGs)संरक्षण तथा विकास कार्यक्रम

  • केंद्र शासनाने राज्यातील कातकरी,कोलाम व माडीया गोंड या तीन जमाती आदिम जमाती म्हणून घोषीत केलेल्या आहेत.
अ.क्र. जमात जिल्हे
1 कातकरी ठाणे, पालघर, रायगड, पुणे व नाशिक
2 कोलाम यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर
3 माडीया गोंड गडचिरोली
  • या जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमाखाली (CCD Plan) विविध व्यक्तीगत तसेच समुह विकास योजना राबविण्यात येत असतात. त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करुन केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेल्या योजनांची अंमलबजाणी करण्यात येत असते.
  • आदिम जमातींकरीता राज्य योजनेतून देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. आदिम जमाती विकास कार्यक्रम याकरिता दि. 17/9/2019 च्या मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत.
  • सन 2018-19 ते 2021-22 या कालावधीकरिता प्राप्त निधीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे.
Scheme Year Project Sanctioned fund Sanctioned fund Received
PvTG 2018-19 23 1230.26 1230.26
2019-20 16 2510 2510
2020-21 3 1510 1412
2021-22 0 0 0
2022-23 0 0 0

Total

42 5250.26 5152.26

Tribal Development Department, Wardha © 2024. All Rights Reserved Adira Infotech